Rohilee Wedding: रोहित-जुईली अडकणार लग्नबंधनात! उरले फक्त 9 दिवस

Rohit raut Juilee joglekar will get married in next 9 days
Rohilee Wedding: रोहीत जुईली अडकणार लग्नबंधनात! उरले फक्त 9 दिवस

बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतही सध्या लग्नाचे चौघडे वाजण्यास सुरुवात झाली. अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule)  आणि प्रतिक शाह (Pratik Shah )  यांनी नुकताच साखरपुडा उरकला. त्यानंतर सारेगमप लिटील चॅम्प रोहित राऊत (Rohit Raut )  आणि त्याची गर्लफ्रेंड गायिका जुईली जोगळेकर ( Juilee Joglekar )  देखील लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत ‘नाइन डेज डू गो’ #rohilee असा हॅशटॅग शेअर करत लग्नाची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली.  खरंतर रोहित आणि जुईली २०२१मध्येच लग्न करणार होते. दोघांच्या घरचे लग्नाच्या तयारी लागले आहेत. रोहित आणि जुईलीच्या केळवणाचे फोटो देखील पहायला मिळाले होते. दोघे त्यांच्या लग्नाविषयी फार उत्सुक आहेत. त्यांचे चाहते देखील त्यांच्या लग्नाची आतुरते वाट पाहत होते. रोहित जुईलीच्या लग्नाला नऊ दिवस बाकी आहेत. म्हणजेच २३ जानेवारीला दोघेही विवाह बंधनात अडकण्याची शक्यता आहे. ( फोटो – रोहित राऊत जुईली जोगळेकर इन्स्टाग्रामवरुन साभार )

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shyam Raut (@rohitshyamraut)