पत्राचाळ घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. साधारण १०० दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर ते आज (१० नोव्हेंबर) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज संजय राऊत यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
संजय राऊत ‘मातोश्री’वर दाखल होताच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली.
‘मातोश्री’वर दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी संजय राऊत यांचे औक्षण केले.
‘मातोश्री’वर संजय राऊत यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
संजय राऊत हे माझे जीवलग मित्र आणि तसेच हे शिवसेनेची लांब पल्ल्याची तोफ असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
आपल्याला सगळीकडे दिसतेय की ‘टायगर इज बॅक’ आणि ‘राऊत इज नॉट आऊट’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.