गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील ९० टक्क्यांहून अधिक आहे. मुंबईतील रुग्णसंख्येत देखील घट पाहायला मिळत आहे. पण तरी देखील कोणताही हलगर्जीपणा होऊन नये म्हणून सांताने सॅनियटायझेशन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सध्या मुंबईत सर्वात जास्त गर्दी असलेले ठिकाण म्हणजेच बसस्टॉप आणि बसेसमध्ये सांता सॅनिटायझेनशन करण्यासाठी अवतरला आहे.
Photo – सांता अवतरला सॅनिटायझेशनला!
जगभरात अजूनही कोरोना कहर कायम आहे. सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक देशामध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पण भारत सरकारने अद्याप कोणत्याही स्वदेशी लस कंपन्यांना लस देण्याची मंजूरी दिली नाही आहे. त्यामुळे अजूनही भारतात कोरोना नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत सांता सॅनिटायझेशन करताना दिसला. (छायाचित्र - दीपक साळवी)