पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याकरता अनेकजण आज शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले होते. यावेळी शिवभक्तांचा उत्साह पाहण्याजोगा होता.
(सर्व फोटो – ट्विटर/देवेंद्र फडणवीस)
आज राज्यभर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला.
पुण्याच्या किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते.
राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा गायला गेला.
राज्यभरातील असंख्य शिवभक्त येथे हजर होते.
पारंपरिक खेळांचा अविष्कारही येथे पाहायला मिळाला.
यावेळी उपस्थित सर्वांनी शिवभक्तांना संबोधित करत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन करण्यात आले.
यावर्षी सामान्य शिवभक्तांना जन्मस्थळाचे दर्शन घेता आले नाही. परंतु, पुढच्या वर्षी नियोजनपूर्वक कार्यक्रम करू असे आश्वासन देण्यात आले.
अबालवृद्धांसह सर्वांनीच येथे पारंपरिक खेळांचं चित्तथरारक प्रदर्शन केलं.
शालेय विद्यार्थींनी नऊवारी नेसून लाठीकाठी खेळ केला.
यावेळी अनेक बालशिवबाही शिवनेरीवर दाखल झाले होते.
विविध राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर भव्य असा शिवजयंती उत्सव साजरा झाला.