घरफोटोगॅलरीशिवबंधन ते रक्षाबंधन: महापालिका परिचारिकांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधत मानले आभार

शिवबंधन ते रक्षाबंधन: महापालिका परिचारिकांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधत मानले आभार

Subscribe

. कोरोनासारख्या बिकट परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंनी जे सहकार्य केले त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेतील परिचारिकांनी उद्धव ठाकरे यांना 'राखी' बांधून भावना व्यक्त केल्या.

२०१९ साली उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्या नंतर काहीच महिन्यात कोरोनासारख्या महामारीने राज्यतच नव्हे तर संपूर्ण देशात डोकं वर काढलं. पण अशा बिकट काळातही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याची जबाबदारी उत्तमपणे पेलली. राज्यातील प्रत्येक भागात स्वतः लक्ष देत उद्धव ठाकरे यांनी या महामारीला तोंड दिले.

या संपूर्ण काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र उत्तमपणे सांभाळला. महाराष्ट्र म्हणेज एक कुटुंब आहे आणि उद्धव ठाकरे हे या कुटुंबाचे प्रमुख आहेत. उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वामुळे त्यावेळी राज्यात ‘कुटुंब प्रमुख’ अशी उद्धव ठाकरेंची प्रतिमा निर्माण झाली. दरम्यान या सगळ्यात रुग्णालयांमध्ये काम करत असलेले डॉक्टर्स, परिचारिका आणि सर्व कर्मचारी यांनी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यासाठी उद्धव ठाकरें वेळोवेळी परिचारिका आणि सर्व कर्मचारी यांचे आभार मनात असतं त्याच बरोबर त्यांना योग्य ते सहकार्य सुद्धा करत असतं. याच निमित्ताने मुंबई महानगर पालिकेतील परिचारिका आणि डॉक्टर्स यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवास स्थानी जाऊन भेट घेतली. आणि त्यांना राखी बांधून स्वतःच्या भावना व्यक्त केल्या.

- Advertisement -

१) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होत होता. राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळत होते. पण अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र उत्तमपणे सांभाळला.

 

- Advertisement -

२) अशा परिस्थिती उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधत होते. राज्याचा आढावा घेत होते.

 

३) उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका रुग्णालयातील आणि राज्यातील इतर रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आणि सर्व कर्मचारी यांना वेळोवेळी सहकार्य करत होते.

 

४) याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेतील डॉक्टर्स, परिचारिका आणि सर्व कर्मचारी यांनी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

 

५) कोरोनासारख्या बिकट परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंनी जे सहकार्य केले त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेतील परिचारिकांनी उद्धव ठाकरे यांना ‘राखी’ बांधून भावना व्यक्त केल्या. उद्धव ठाकरेंनीसुद्धा सर्वांकडून राखी बांधून घेतली.

 

६) उद्धव ठाकरे यांना राखी बांधताना सर्व परिचारिकांच्या चेहऱ्यावर आनंद उमललेला दिसत आहे. कोरोनाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर राज्यातील कोरोना रुग्ण संख्येचादरसुद्धा कमी झाला.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -