कोंडा ही एक सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला ही समस्या असेल किंवा केस धुतल्यावर दोन दिवसांनी पुन्हा कोंडा होत असेल तर टाळूला तेल लावणे टाळा. टाळूवर बुरशीजन्य संसर्गामुळे कोंडा होतो. काही तेलांमध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असते ज्यामुळे केसांमध्ये कोंड्यासारखी समस्या वाढते. यामुळे कोंडा कमी करण्यासाठी टी ट्री ऑईलचे चार ते पाच थेंब शॅम्पूमध्ये मिसळून ते केसांना लावा.
केसात कोंडा झाल्यास तेल लावावे की नाही? असा प्रश्न पडला असेल तर, जाणून घ्या याचे उत्तर..
कोंडा ही एक सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला ही समस्या असेल किंवा केस धुतल्यावर दोन दिवसांनी पुन्हा कोंडा होत असेल तर टाळूला तेल लावणे टाळा.
टाळूवर बुरशीजन्य संसर्गामुळे कोंडा होतो. काही तेलांमध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असते ज्यामुळे कोंडा अधिक होतो.
जर तुमची टाळू तेलकट असेल तर केसांना जास्त तेल लावू नका. कोंडा कमी झाल्यानंतर केस धुण्याच्या एक ते दोन तास आधी तेल लावा.
तेलकट टाळूवर जास्त तेल लावल्याने किंवा वारंवार तेल लावल्याने पोर्स क्लॉग होऊ शकते.
कोंडा कमी करण्यासाठी टी ट्री ऑईलचे चार ते पाच थेंब शॅम्पूमध्ये मिसळून ते केसांना लावा.
शॅम्पू लावल्यानंतर दोन दिवसांनी कोंडा पुन्हा येत असेल तर त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.