Rohilee Wedding : रोहित जुईली अडकले लग्नबंधनात, पुण्याच्या ढेपे वाड्यात पार पडला सोहळा

'फॉरेव्हर' म्हणत रोहित जुईलीने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघांच्या लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी दोघांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Singer rohitt raut and juilee joglekar got married in pune dhepe wada, see wedding rituals photo
Rohilee Wedding : रोहित जुईली अडकले लग्नबंधनात, पुण्याच्या ठेपे वाड्यात पार पडला सोहळा

मराठी संगीत विश्वातील कुलेस्ट कपल रोहित राऊत (Rohit Raut)  आणि जुईली जोगळेकर (juilee joglekar ) यांनी लग्न केले असून पुण्याच्या ढेपे वाड्यात पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. (Singer rohitt raut and juilee joglekar got married in pune dhepe wada)  दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाचे काऊंट डाऊन सुरू केले होते. दोघांच्या लग्नासाठी त्यांचे चाहते फार आतून होते. अखेर चाहत्यांची कूलेस्ट सिंगर जोडी विवाह बंधनात अडकली आहे. ‘फॉरेव्हर’ म्हणत दोघांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघांच्या लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी दोघांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Juilee Joglekar (@juilee.sangeet)

दोघांनी अनेक मुलाखतीत आणि सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. मात्र कोरोनामुळे त्यांचे लग्न लांबणीवर पडले होते. अखेर 23 जानेवारीच्या मुहूर्तावर दोघांनी लग्न केलेय दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. ग्रहमख, मेहंदी, हळद, साखरपूडा अशा साग्रसंगीत विधी पार पडल्या आहे. पुण्याच्या ठेपे वाड्यात दोघांनी आयुष्यभरासाठी एकत्र येण्याची शपथ घेतली.

दोघांच्या लग्नाला जवळचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक उपस्थित होते. हळदीला अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर तसेच गायक नचिकेत लेले, स्वानंदी टिकेकर देखील उपस्थित होती. पहा रोहिलीच्या लग्नाचे खास फोटो. ( फोटो: रोहित राऊत इन्स्टाग्रामवरुन साभार )