Corona Vaccination : माधवबागमध्ये महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम

मोहीमेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.

महिलांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी पुढे यावे यासाठी मुंबईत महिलांसाठीचे विशेष लसीकरण सत्र राबवण्यात येत आहेत.मुंबई पालिकेकडून मागील आठवड्यात देखील महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. त्या मोहीमेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबई पालिकेकडून आज पुन्हा एकदा महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते. माधवबागमध्ये अतुल शहा यांच्या तर्फे विशेष लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली.मुंबईतील एकूण २७७ निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि सर्व शासकीय आणि पालिका रुग्णालय तसेच कोविड सेंटरमध्ये महिलांसाठीचे विशेष लसीकरण सत्र राबवण्यात येणार आहे. (छाया : दिपक साळवी)

 


हे ही वाचा – ईडी हे भाजपचं उपकार्यालय; अडसूळ यांच्यावरील कारवाईनंतर अरविंद सावंत यांचा हल्लाबोल