दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. आणि त्यातच भारतामध्ये १३ वा वनडे वर्ल्ड खेळवला जात आहे. रविवारी भारताला वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्ससोबत शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. विश्वचषकात व्यस्त असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडंनीही व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत दिवाळी साजरी केली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या दिवाळी सेलिब्रेशनचे खास व्हिडीओ शेअर केला आहे.
आज (रविवारी) भारताला वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्ससोबत शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे.
या आधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकत्र दिवाळी साजरी केली. सर्व खेळाडू भारतीय ट्रेडिशनल लूकमध्ये दिसले.
विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत तर रोहित शर्माही पत्नी आणि मुलीसोबत दिवाळी सेलिब्रेशन करताना दिसला. या खास दिवाळी सेलिब्रेशनमध्ये प्रशिक्षक राहुल द्रविडही सहभागी झाला.
भारतीय संघातील खेळाडूंनी बंगळुरुमध्ये संघ कुटुंबियांसोबत मोठ्या दिवाळी साजरी केली, याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.