घरताज्या घडामोडीTauktae Cyclone: मुंबईत मुसळधार पाऊस, दादर हिंदमाता परिसरात साचले पाणी

Tauktae Cyclone: मुंबईत मुसळधार पाऊस, दादर हिंदमाता परिसरात साचले पाणी

Subscribe

चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने येत असल्याने मुंबई महापालिकेने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईत काही भागात पाणी साठलं आहे. मुंबईत दादर, हिंदमाता परिसरासह अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे पुन्हा मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी वाहने अडकून पडली आहेत. चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने येत असल्याने मुंबई महापालिकेने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. गरज पडल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे वरळी सीलिंक सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. बाहेर पडण्याचा विचार करत असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. ( छायाचित्र – दीपक साळवी )

 

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -