घरफोटोगॅलरीतौक्ते चक्रीवादळाचा फटका : यंत्रणा लागल्या कामाला !

तौक्ते चक्रीवादळाचा फटका : यंत्रणा लागल्या कामाला !

Subscribe

१५ मे रोजी रात्रीपासूनच शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तसेच, जोरदार वारेही सुटले होते. सतत तीन दिवस पडणाऱ्या वाऱ्यासह पावसांमुळे शहराच्या मध्यवस्तीत आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे पडली होती.

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई शहरात जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक झाडे पडल्याच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक ठिकाणी घरांवर, रस्त्यावर आणि वाहनांवरही झाडे पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही झाली, मात्र जीवितहानी झालेली नाही. अरबी समुद्रातून अलिबाग, मुंबईच्या दिशेने आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा सर्वच राज्याच्या वातावरणावर परिणाम दिसून आला. १५ मे रोजी रात्रीपासूनच शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तसेच, जोरदार वारेही सुटले होते. सतत तीन दिवस पडणाऱ्या वाऱ्यासह पावसांमुळे शहराच्या मध्यवस्तीत आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे पडली होती.तसेच मुंबई जवळील अर्नाला विरार येथे तौक्ते चक्रीवादळाच्या वेळी अनेक मच्छीमारांचे नुकसान झाले.

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -