राणीच्या बागेत नव्या पाहुण्यांची एंट्री; वाघ आणि पेंग्विनच्या पिलांचं ठेवलं ‘हे’ नाव

बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर) व करिष्मा (मादी) यांनी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी जन्म दिलेल्या मादी बछड्याचे नामकरण करण्यात आले असून तिचे नाव 'वीरा' असे ठेवण्यात आले आहे. तर हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील मोल्ट (नर) व फ्लिपर (मादी )यांच्या जोडीने १८ ऑगस्ट २०२१ रोजी जन्म दिलेल्या पेग्विन नर पिल्लाचे नामकरण करण्यात आले असून त्याचे नाव 'ऑस्कर' असे ठेवण्यात आले आहे.

The entry of new guests into the ranichi baug ;Named after the tiger and penguin cubs
राणीच्या बागेत नव्या पाहुण्यांची एंट्री; वाघ आणि पेंग्विनच्या पिलांचं ठेवलं 'हे' नाव

मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहायलयात नवीन पाहुण्यांची एंट्री झालेय. या राणीच्या बागेत जन्मलेल्या पेग्विनच्या पिल्लाचं आणि वाघाच्या बछड्याचे आज मंगळवारी १८ जानेवारीला नामकरण करण्यात आले.बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर) व करिष्मा (मादी) यांनी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी जन्म दिलेल्या मादी बछड्याचे नामकरण करण्यात आले असून तिचे नाव ‘वीरा’ असे ठेवण्यात आले आहे. तर हम्बोल्ट पेंग्विन कतीक्षाल मोल्ट (नर) व फ्लिपर (मादी )यांच्या जोडीने १८ ऑगस्ट २०२१ रोजी जन्म दिलेल्या पेग्विन नर पिल्लाचे नामकरण करण्यात आले असून त्याचे नाव ‘ऑस्कर असे ठेवण्यात आले आहे. या नामकरणाची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज १८ जानेवारी २०२२ रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील थ्रीडी ऑडिटोरियम येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.(सौजन्य : The Mumbai zoo)


हेही वाचा – Photo: समुद्र किनाऱ्यावर Kim Kardarshianचा बिकनी जलवा