IIFA 2022 मध्ये पुरस्कार पटकावून ‘या’ कलाकारांनी मारली बाजी

यावर्षीचा IIFA 2022 पुरस्कार सोहळा दुबईतील अबूधाबी येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये सलमान खान, शाहरूख खान, विकी कौशल, कृती सेनन, ऐश्वर्या बच्चन, अनन्या पांडे, सई ताम्हणकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. शनिवारी रात्री या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.