धूमधडाक्यात पार पडला नयनतारा आणि विग्नेश शिवनचा विवाह सोहळा

After marriage, Nayantara goes to Devdarshan with her husband
६ वर्षाच्या नात्यानंतर ९ जून रोजी हे कपल विवाहद्ध झाले.

कॉलीवूडची सुपरहिट जोडी नयनतारा आणि विग्नेश शिवन यांचा नुकताच विवाह सोहळा पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नयनतारा आणि विग्नेश शिवनच्या लग्नाची चर्चा चालू होती. 6 वर्षाच्या लॉंग रिलेशननंतर दोघेही आता पती-पत्नी झालेले आहेत. नुकताच नयनताराने आपल्या लग्नाचा पहिला फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहताच चाहत्यांनी नयनतारा आणि विग्नेशला सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.