भारतामध्ये फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळ आहेत. धबधबे,नदी, समुद्र, दऱ्या-खोऱ्या, तीर्थस्थळं, किल्ले यांसारखे विविध पर्यटन स्थळं भारतात प्रसिद्ध आहेत. फक्त भारतीयचं नाही तर विदेशातील अनेक मंडळी देखील या पर्यटन ठिकाणी भेट देतात. कधी आपल्या पार्टनरसोबत तर कधी कुटुंबीय किंवा मित्र-मैत्रिणींसोबत अनेकजण विविध ठिकाणी फिरण्यासाठी जातात. मात्र, भारतात अशा काही महिला आहेत ज्यांना एकटं फिरायला आवडतं. भारतात अशी सुद्धा काही ठिकाणं आहेत, जी महिलांसाठी सुरक्षित आणि फिरण्यायोग्य आहेत.
शिलांग (मेघालय) —
मेघालयातील शिलांगला ढगांचे घर देखील म्हटले जाते. हे महिलांसाठी सुरक्षित पर्यटन स्थळ आहे.
दार्जिलिंग (पश्चिम बंगाल)–
दार्जिलिंगला डोंगरांची राणी देखील म्हटलं जातं. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात.
शिमला (हिमाचल प्रदेश) —
भारतातील लोकप्रिय आणि सुंदर पर्यटन स्थळांमध्ये शिमलाचा देखील समावेश आहे.
जयपुर (राजस्थान) —
राजस्थानमधील जयपुरमध्ये अनेक पुरातन किल्ले आहेत. हे शहर महिलांसाठी सुरक्षित पर्यटन स्थळ आहे.
नैनीताल (उत्तराखंड) —
उत्तराखंडातील शांत दऱ्या-खोऱ्यांमध्ये नैनीताल हे सुंदर शहर वसलेलं आहे. या ठिकाणी महिला यात्री निर्धास्तपणे भेट देऊ शकतात.
पुणे : देशातील अनेक गणेशभक्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येतात. या गणेशभक्तांसाठी आणि खास करून पुण्यातील गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दगडूशेठ गणपती मंदिराला...
- संतोष पाटील
पालघर : वाडा तालुक्यात अजूनही अशी प्रेक्षणीयस्थळे आणि ऐतिहासिक वारसा आणि पांडवकालीन, पुरातन काळातील मंदिरं आज पाहावयास मिळतात. यापूर्वी वाडा तालुक्याला कोलम...