Independence Day 2022: देशाच्या 75 वर्षांच्या वाटचालीत महाराष्ट्रातील या रत्नांचा मोलाचा वाटा

भारताच्या या ७५ वर्षांच्या काळात देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचाही मोलाचा वाटा आहे. या काळात अनेक घटना घडामोडी घडल्या. महाराष्ट्रातील कलाक्षेत्रातील दिग्गजांनी महाराष्ट्रासह भारतचंही नाव सुद्धा आंतराष्ट्रीय पातळीवर नावारूपाला आणलं. जाणून घेऊया अशाच भारताच्या अमूल्य रत्नांविषयी.

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. केंद्र सरकार कडून सुद्धा विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणारा आहे. भारताच्या या 75 वर्षांच्या काळात देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचाही मोलाचा वाटा आहे. या काळात अनेक घटना घडामोडी घडल्या. महाराष्ट्रातील कलाक्षेत्रातील दिग्गजांनी महाराष्ट्रासह भारतचंही नाव सुद्धा आंतराष्ट्रीय पातळीवर नावारूपाला आणलं. जाणून घेऊया अशाच भारताच्या अमूल्य रत्नांविषयी.

1) लता मंगेशकर –

मेरी आवाज ही पेहेचान है हे वाक्य गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या बाबतीत तंतोतंत लागू होतं. लता मंगेशकर यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात रसिक श्रोत्यांना त्यांच्या गाण्यांमधून नितळ आनंदच दिला आहे. लता मंगेशकर यांना त्यांच्या योगदानासाठी क्विन ऑफ मेलडी या सारख्या अनेक पदव्यांनी सन्मानित केले आहे. लता मंगेशकर यांनी महाराष्ट्र आणि भारताचं नाव जगभरात मोठं केलं. रसिकांच्या मनात लता मंगेशकर यांचं नाव आणि त्यांची गाणी अबाधित राहतील.

2) अशा भोगले –

अशा भोसले यांनी त्यांच्या गाण्याने रसिकांच्या मनावर अमेट ठसा उमटवला आहे. मराठीसह हिंदी कॅब्रे गाण्यांमध्ये सुद्धा स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अशा भोसले यांनी नेहमीच वेगवगेळ्या जॉनरची गाणी गायली आहेत. संगीतातील विविध पुरस्कारांसह अशा भोसले यांना महाराष्ट्र राज्य सरकारचे जवळपास 15 पुरस्कार मिळालेले आहेत. त्या शिवाय त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले आहे.

3) किशोरी आमोणकर –

हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका म्ह्णून सुप्रसिद्ध असेलल्या गायिका म्हणजे किशोरी आमोणकर. किशोरी आमोणकर ह्या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करायच्या ‘गानसरस्वती’ ही त्यांची ओळख. अवघा रंग एक झाला हे अजरामर गाणं यांच सुरेल गळ्यातून साकार झालं आहे. पद्मभूषण आणि पदमविभूषण या सह संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कार किशोरी आमोणकर यांना मिळाले.

4) पंडित भीमसेन जोशी –

शास्त्रीय संगीतात स्वतःच्या गाण्याने वेगळी ओळख निर्माण करणारे गायक म्हणजे पंडित भीमसेन जोशी. महाराष्ट्रातील अनेक अमूल्य रत्नांपैकी एक आहे. पंडित भीमसेन जोशींनी त्यांच्या सुरांनी अनेक मैफिली अजरामर केल्या आहेत. पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कारही त्यांना मिळाले होते.

——————————————————————————————————

Independence Day 2022 : भारतीय महिला आणि त्यांचे सुप्रसिद्ध ब्रँड