सोनाली बेंद्रेपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत ९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्रींची ओटीटीवर एन्ट्री

सध्या ९० च्या दशकातील दिग्गज अभिनेत्री ओटीटीवर पदार्पण करत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी डिज्नी प्लस हॉटस्टारने ओटीटीच्या माध्यमातून काजोल त्यांच्यासोबत सीरिजमध्ये काम करणार असल्याची घोषणा केली होती. याआधी सुद्धा ९० च्या दशकातील बऱ्याच अभिनेत्रींनी ओटीटीवर पदार्पण केलं आहे. २०२० मध्ये ‘आर्या’ या वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री सुष्मिता सेनने ओटीटीवर पदार्पण केले होते, तर अभिनेत्री माधुरी दीक्षितने सुद्धा नेटफ्लिक्सच्या माध्यमातून ‘द फेम गेम’मध्ये दिसून येणार आहे.