आज गणेश जयंतीला बाप्पाचे करा मनोभावे पूजन

प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. असं म्हणतात की, जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. यंदा 25 जानेवारी म्हणजेच आज गणेश जयंती साजरी केली जाईल.