PHOTO : मालेगावात उद्धव ठाकरेंच्या ‘शिवगर्जने’ला अलोट गर्दी

उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगाव येथे जाहिर सभा झाली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप यांच्यावर निशाणा साधला. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांना दिला. हिम्मत असेल तर निवडणुका घ्या, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. या सभेला अलोट गर्दी झाली होती. सभेतील काही क्षण…

शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. गेल्या वर्षी एक कांदा ५० कोटी रुपयांना विकला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच हमी भाव मिळतो आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरेंच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. तुम्हाला हे सरकार मान्य आहे का? यासह अनेक प्रश्न उद्धव ठाकरे उपस्थित करत होते. त्यांच्या प्रश्नांना गर्दीतून प्रतिसाद मिळत होता.

हिम्मत असेल तर निवडणुका घ्या. मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो. तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने मतं मागा. बघू जनता कोणाला साथ देते, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.