उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट

शिवसेना खासदार संजय राऊत यांची तब्बल १७ तास चौकशी केल्यानंतर ईडीने अटक केली.संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं तेव्हा त्यांचे कुटुंबिय भावूक झाले होते. कठीण काळात राऊतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचा विश्वास देण्याकरता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.ऊतांच्या आईसोबत बोलताना उद्धव ठाकरे भावूक झाले.