या दीपोत्सवाद परदेशी कलाकार रामलीला कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामध्ये रशिया, श्रीलंका, सिंगापूर आणि नेपाळमधील कलाकार भाग घेणार आहेत. देशातील २१ राज्यांतील रामलीला आणि रामायण परंपरेवर आधारित लोक सादरीकरण केले जाणार आहे. यासाठी सुमारे अडीच हजार कलाकार अयोध्येत पोहोचले आहेत.
राज्यासह देशभरात दिवाळी सुरू झाली आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येकचजण आपल्या आपल्या परिने तयारी करत आहे. आता राज्यात दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे. खास दिवाळी उत्सवासाठी उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीमध्ये भव्य दीपोत्सावाचे आयोजन केले जात आहे.
- Advertisement -
योगी आदित्यनाथ यांनी युपीमध्ये मुख्यमंत्रिपद स्वीकराल्या नंतरचा हा सातवा दीपोत्सव आहे. या दिपोत्सवा दरम्यान युपीसह अनेक राज्यांच्या संस्कृतीची ओळख करून दिली जाणार आहे. 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान भारत कुंड, गुप्तार घाट, बिर्ला धर्मशाळा, रामघाट, रामकथा पार्कमध्ये भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
दीपोत्सवादरम्यान शरयू नदीच्या काठावरील लेझर शो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. लेझर लाईट कार्यक्रामाची जय्यत तयारी सुरू आहे. शरयू नदीच्या काठावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शरयू नदीचा किनारी अतिशय सुंदररित्या सजवण्यात आला आहे.
या दीपोत्सवाद परदेशी कलाकार रामलीला कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामध्ये रशिया, श्रीलंका, सिंगापूर आणि नेपाळमधील कलाकार भाग घेणार आहेत. देशातील २१ राज्यांतील रामलीला आणि रामायण परंपरेवर आधारित लोक सादरीकरण केले जाणार आहे. यासाठी सुमारे अडीच हजार कलाकार अयोध्येत पोहोचले आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील या दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र त्या कार्यक्रामाला उपस्थित राहू शकणार नाहीत. अयोध्येत रामाच्या भव्य मंदिराचे बांधकाम जोरात सुरू आहे. 22 जानेवारी 2024 रोजी राम लल्लाच्या अभिषेकची तयारी सुरू आहे.