घरफोटोगॅलरीउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई भेटीवर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई भेटीवर

Subscribe

गुरुवारी सकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये पोहोचले.मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.राज्यपालांच्या विनंतीवरून योगी आदित्यनाथ यांनी राजभवनातील ब्रिटिश कालीन भुयारात निर्माण करण्यात आलेल्या ‘क्रांतिगाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली.यावेळी त्यांनी संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन शिवरायांना अभिवादन केले.आदित्यनाथ यांनी भूमिगत संग्रहालयाबाहेर समुद्रकिनारी असलेल्या श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले व उपस्थितांसोबत देवीची आरती केली.यावेळी त्यांनी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ध्यानमग्न भगवान शिवाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -