घरताज्या घडामोडीVicky Katrinaच्या लग्नाचे फोटो आले समोर, पहा मिस्टर अँड मिसेस Kaushalची पहिली...

Vicky Katrinaच्या लग्नाचे फोटो आले समोर, पहा मिस्टर अँड मिसेस Kaushalची पहिली झलक

Subscribe

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी लग्नगाठ बांधली. राजस्थानच्या आलिशान सवाई माधोपूर सिक्स सेंसेज फोर्टमध्ये दोघांनी आयुष्यभरासाठी सात फेरे घेतले. दोघांनीही सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत लग्न झाल्याची बातमी दिली आहे. विक्की आणि कतरिना यांनी पहिल्यांदा त्यांच्या नात्याचा खुलासा थेट लग्नाचे फोटो शेअर केला आहे. दोघेही लग्नात फार सुंदर दिसत आहेत. खरंतर दोघांच्या लग्नाचे फोटो मॅग्झीनला विकणार असे सांगण्यात आले होते. लग्नाच्या ठिकाणी देखील नातेवाईक मित्रमंडळींनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यास मज्जाव केला होता त्यामुळे दोघांच्या लग्नाचे फोटो एवढ्यात पहायला मिळणार नाही असे चाहत्यांना वाटले होते मात्र दोघांनीही सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना मोठे सप्राइज दिले आहेत.

आमच्या मनात फक्त प्रेम आणि कृतज्ञता आहे ज्याने या क्षणापर्यंत आणले आहे. आम्ही आमच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत त्यासाठी तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असेच राहू द्या, असे म्हणत विक्की आणि कतरिनाचे लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत. चाहते देखील दोघांनी शेअर केलेले फोटो भलतेच खुश झाले आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

मेरे यार की शाही हे असे म्हणत प्रियंका चोप्राने कतरिना विक्कीला शुभेच्छा दिल्यात तर निकने देखील दोघांचं अभिनंदन केलंय. त्याचप्रमाणे आलियाने देखील दोघांना तुम्ही खूप खूप खूप क्यूट दिसत आहात असे म्हणत प्रेम व्यक्त केले आहे. तर करिना कपूरने दोघांना आशिर्वाद देत सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर ह्रतिक रोशने दोघांना शुभेच्छा देत त्यांच्यासोबत डान्स करण्याची इच्छा दाखवली आहे.

पहा विक्की कतरिनाच्या लग्नाचे खास फोटो

 

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -