राज्यासह मुंबईतही उकाडा वाढत चालला आहे. अशावेळी माणसांसोबत मैदानालाही गारव्याची नितांत गरज भासते. त्यासाठी मुंबईतील क्रॉस मैदानावर पाण्याचा मारा करण्यात आला. मुंबई बाहेरील बरेच पर्यटक मुंबई दर्शन दरम्यान क्रॉस मैदानाला भेट देतात. यावेळी मैदानावर मारणाऱ्या पाण्याच्या शॉवरचा आनंद लुटताना हे पर्यटक दिसत आहेत.