ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठ्या जल्लोषात स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरी पोहोचताच त्यांचे कुटुंबियांकडून स्वागत करण्यात आलं.

काल एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने विधानसभेत १६४ आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत सादर केले. तसेच काल रात्री एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार शिंदेंच्या ठाण्यातील निवास स्थानी पोहोचले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी अनेकांची जय्यत तयारी करण्यात आली होती. ठाण्यात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास नमन केले. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. तसेच ठाण्यात पोहोचल्यावर त्यांनी सर्वप्रथम त्यांचे गुरू धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाला भेट दिली.