….म्हणून स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिवशी साजरा करता ‘National Youth Day’

भारतीय युवा दिवस साजरा करण्याचे खास कारण म्हणजे या दिवशी जगद्विख्यात भारतीय विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी उत्तर कोलकातामधील सिमलापल्ली येथे झाला. त्यांनी भारताला स्वतःच्या अस्मितेची जाणीव उत्पन्न करून दिली आणि पाश्चात्य जगाला भारताचा परिचय करून दिला.

Why celebrate National Youth Day on Swami Vivekananda's birthday?
....म्हणून स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिवशी साजरा करता 'National Youth Day'

आज 12 जानेवारीला संपूर्ण देशभरात राष्ट्र्रीय युवा दिवस (National Youth Day)म्हणून साजरा केला जातो. हा दिवस देशातील या युवकांना समर्पित केला जातो, जे युवक देशाचे भविष्य साकारण्यासाठी सज्ज आहेत. या दिवशी जगद्विख्यात भारतीय विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी उत्तर कोलकातामधील सिमलापल्ली येथे झाला. त्यांनी भारताला स्वतःच्या अस्मितेची जाणीव उत्पन्न करून दिली आणि पाश्चात्य जगाला भारताचा परिचय करून दिला. विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त रामकृष्ण मिशनचे केंद्र असलेल्या रामकृष्ण मठात आणि त्यांच्या शाखांमध्ये विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याशिवाय विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, यादिवशी ‘राष्ट्रीय युवक दिवस’ का साजरा करतात? हे जाणून घ्या.

 


हेही वाचा – माहितेय का? अभिषेक बच्चन होणार होता Hema Malini चा जावई पण Esha Deol ने ‘या’ कारणासाठी दिला नकार