Photo : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर साजरा झाला महिला दिन

दरवर्षी जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याबरोबरच त्यांची समाजातील ओळख अधोरेखीत करण्यासाठी महिला दिन जगभरात साजरा केला जातो. यादिवशी विविध कार्यक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. त्यांना सन्मानित केले जाते. इतर महिलांना त्यातून प्रेरणा मिळावी हा त्यामागचा हेतू असतो. दरम्यान, अशातच आज विधानभवनात आगमन होतेवेळी सर्व सन्माननीय महिला सदस्यांचे विधानसभा अध्यक्ष महोदय श्री राहुल नार्वेकर आणि उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांचेकडून गुलाबपुष्प देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले. तसेच, आजच्या विधानसभा कार्यक्रम पत्रिकेवर सर्व लक्षवेधी सूचना सन्माननीय महिला सदस्यांच्याच घेण्यात आल्या आहेत.