७ जुलै रोजी जगभरात चॉकलेट डे साजरा केला जातो. खरंतर हा दिवस साजरा करण्यामागे जगभरातील लोकांना चॉकलेटचे महत्व सांगणाचा मुख्य उद्देश आहे. जगभरातील अनेक लोकांना चॉकलेट खायला आवडते. तसेच आजकाल प्रेमी युगलांमध्ये देखील चॉकलेट खास मानले जाते. ९ फेब्रुवारी दिवशी सुद्धा प्रेमी युगल चॉकलेट डे साजरा करतात. मात्र आजचा वर्ल्ड चॉकलेट डे साजरा करण्यामागे नात्यांमध्ये गोडवा आणि प्रेम जोडणे हा उद्देश आहे. शिवाय चॉकलेट खाणं आपल्या आरोग्यासाठी देखील चांगलं असतं.