कल्याणमध्येही शिवसेनेत फूट, 40 आजी-माजी नगरसेवक शिंदे गटात

कल्याण-डोबिंवलीमधील 40 आजी-माजी नगरसेवकांनी एकनाथ गटाला पाठिंबा दिला आहे. ठाणे, नवी मु्ंबईनंतर शिवसेनेला हा तिसरा धक्का बसला आहे.

KDMC

कल्याण-डोबिंवलीमधील 40 आजी-माजी नगरसेवकांनी एकनाथ गटाला पाठिंबा दिला आहे. या नगरसेवकांसोबत काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही गटाला पाठिंबा दिला आहे. ठाणे, नवी मु्ंबईनंतर शिवसेनेला हा तिसरा धक्का बसला आहे. शिवसेनेचे कल्याण-डोबिंवली महापालिकेत मागील काही वर्षांपासून वर्चस्व आहे.

40 आजी माजी नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा –

कल्याण-डोबिंवलीमधील 40 आजी-माजी नगरसेवकांनी एकनाथ गटाला पाठिंबा दिला आहे. यावेळी कल्याण-डोंबिवलीतील माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेला ठाणे, नवी मुंबईत फटका –

शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडाचे लोण स्थानिक पतळीवर पोहचू लागले आहे. एकनाथ शिंदेंचे वर्चस्व असलेल्या ठाणे महापालिकेत शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. शिवसेनेचे 67 पैकी 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तर नवी मुंबई महानगरपालिकेतील 30 नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची कसोटी –

मुंबई महापालिकेसह ठाणे, कल्याण-डोबिंवली महापालिकेवर शिवसेनेचे काही दशकांपासून वर्चस्व आहे. त्यापैकी ठाणे, कल्याण-डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला खिंडार पडले आहे. तर, मुंबईतील यशवंत जाधव आणि समाधान सरवणकर हे दोन नगरसेवक उघडपणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची कसोटी लागणार आहे.