महायुती सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या अनेक विधानामुळे त्यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही अडचणींचा सामना करावा लागला आहे. सत्तार नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेत असताता. दरम्यान, सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या एका सभेवेळी अब्दुल सत्तार यांनी केलेलं एक विधान पुन्हा व्हायरल होतं आहे. ‘माझ्या नावातच सत्ता असल्याने मी सत्तेत असतो’ असं अब्दुल सत्तार भर सभेत म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची 40वी वर्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. यावेळी सभेला संबोधीत करताना अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तारांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली.
माझ्या नावातच सत्ता
अब्दुल सत्तार म्हणाले की, ‘लोक मला विचारतात, तुम्ही प्रत्येक मंत्रिमंडळात कसे असता?, माझ्या नावातूर र काढून टाकले की माझ्या नावातच सत्ता येते. माझा कुणाशीही पर्मनंट करार नसतो, म्हणून मी सत्तेत असतो.’ सत्तार यांनी केलेल्या या विधानानंतर उपस्थितामध्ये हास्यकळ्ळोल उडाला. मात्र सोशल मीडियावर आता सत्तार व्हायरल होऊ लागलेत.
पूर्वी काँग्रेसवासी असलेले अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत येऊन हाती शिवबंधन बांधल. याचवेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याने सत्तार यांच्याकडे राज्यमंत्री पदाची धुरा आली. पुढे शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर सत्तारांनी शिंदेंना साथ दिली. आता महायुतीसरकारच्या काळातही सत्तारांकडे कॅबिनेट मंत्रीपद आलं. यामुळे पक्ष बदलल्यानंतरही किंवा सत्तारांनी केलेल्या विधानांमुळे त्यांच मंत्रिपद जाणार इतकी चर्चा रंगते मात्र , “माझा कुणाशीच पर्मनंट करार नसतो, म्हणून मी नेहमी सत्तेत असतो,” असे उत्तर देऊन सत्तार यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहेत.
हे हि वाचा – बाप्पा महायुतीच्या पाठीशी, 16 आमदारांच्या निलंबन प्रक्रियेवर फडणवीसांची प्रतिक्रिया