घरराजकारणअमेय घोलेंची युवा सेना कार्यकारिणीच्या बैठकीला गैरहजेरी, शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा

अमेय घोलेंची युवा सेना कार्यकारिणीच्या बैठकीला गैरहजेरी, शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा

Subscribe

युवासेना कोषाध्यक्ष अमेय घोले यांना युवासेनेच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. बैठकीचे निमंत्रण असूनदेखील अमेय घोले यांनी शिवसेना भवनातील बैठकीकडे पाठ फिरवली

युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत युवासेना कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. परंतु या बैठकीला युवासेना कोषाध्यक्ष अमेय घोले यांनी अनुपस्थिती दर्शवली आहे. अमेय घोले यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमेय घोले युवासेनेमध्ये नाराज असल्याचे सांगितले जात आहे. आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तींवर अमेय घोले नाराज असून, त्यांनी पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे नाराजी बोलून दाखवली आहे.

युवासेना कोषाध्यक्ष अमेय घोले यांना युवासेनेच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. बैठकीचे निमंत्रण असूनदेखील अमेय घोले यांनी शिवसेना भवनातील बैठकीकडे पाठ फिरवली. युवा सेनेतील कुजबुज आणि युवा सेनेवर होणारे आरोप तसेच युवा सेनेतून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. युवासेनेच्या बैठकीला अनेक सदस्यांनी हजेरी लावली असताना अमेय घोले अनुपस्थित राहिले आहेत. एकंदरीत अमेय घोले यांच्या वर्तवणुकीवरून ते शिंदे गटात जातील, असा समज होत आहे.

- Advertisement -

अमेय घोलेंच्या नाराजीचं कारण काय?

शिवसेना शिंदे गटामधील संघर्षात युवासेनेमध्ये सुद्धा दुपारी निर्माण झाली असल्याचे चित्र अलीकडेच पाहायला मिळालं होतं. शिंदे गटात अनेक युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सदस्यांनी प्रवेश घेतला आहे, आता त्यात अमेय घोले यांचासुद्धा नंबर लागतोय, अशीच चर्चा रंगली आहे. ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये नाराजी सुरू होती, तसेच प्रकार आता युवासेनेत सुरू आहेत. अमेय घोले आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तींवर नाराज आहेत, याबद्दलची नाराजी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली, परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे अमेय घोले बैठकीला अनुपस्थित राहिले आहेत.

- Advertisement -

युवासेनेचे जवळच्या व्यक्तींमुळे नुकसान होत असल्याची भावना अमेय घोले यांनी बोलून दाखवली. तरी याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे. अमेय घोले यांनी युवासेनेचे WhatsApp ग्रुपदेखील लेफ्ट केले आहेत. अमेय घोले यांनी शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर मशाल चिन्ह किंवा शिवसेना नावाचा उल्लेख केलेला नाही. सर्व पाहता अमेय घोले शिंदे गटात जातील अशी चर्चा सुरू आहे.


हेही वाचाः अवमान करणाऱ्या राज्यपालांना हटवावे आणि भाजपा मंत्र्यांनी माफी मागावी; राऊतांची टीका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -