घरराजकारणपहाटेच्या शपथविधीवर अखेर अजित पवारांनी सोडले मौन; म्हणाले...

पहाटेच्या शपथविधीवर अखेर अजित पवारांनी सोडले मौन; म्हणाले…

Subscribe

जालना येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर काहीही बोलण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेच्या कटाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, कोण काय म्हणतंय त्यावर उत्तर द्यायला आम्ही मोकळे नाही. कुणीही कोड्यात बोलू नये. मी उपमुख्यमंत्री असताना अशा प्रकारची कोणतीही चर्चा माझ्या स्तरावर झालेली नाही. 

जालनाः अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. या शपथविधीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र बोलण्यास नकार दिला आहे. मी हा विषय कदापि काढणार नाही, असे आधीच सांगितले असल्याचा पुनर्रउच्चार अजित पवार यांनी शुक्रवारी केला.

जालना येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर काहीही बोलण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेच्या कटाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, कोण काय म्हणतंय त्यावर उत्तर द्यायला आम्ही मोकळे नाही. कुणीही कोड्यात बोलू नये. मी उपमुख्यमंत्री असताना अशा प्रकारची कोणतीही चर्चा माझ्या स्तरावर झालेली नाही.

- Advertisement -

अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाष्ये केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आजही भाजपसोबतच आहेत, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांनी त्यावेळी केलेल्या विधानाची आठवण करून दिली. मला दोष देऊ नका.आमचे आधीच ठरले होते. लोकसभा निवडणुकीआधीच याचे नियोजन झाले होते. मी फक्त पुढे गेलो, असा दावा अजित पवार यांनी केला होता, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची पुन्हा चर्चा सुरु झाली.

यावर संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या स्तंभावर बोलू नये. जुन वाद मिटवून पुढे जायला हवे. तर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार यांच्याविषयी बोललेले खपवून घेतले जाणार नाही. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यामुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली.

- Advertisement -

पहाटेच्या शपथविधीवर सत्ताधारी व विरोधकांच्या प्रतिक्रिया आल्या तरी अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात काहीच खुलासा केला नाही. अखेर जालना येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी त्या घटनेवर बोलणे टाळले. अजित पवार म्हणाले, मी आधीच सांगितले होते की याविषयी मी कदापि बोलणार नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेचा कट होता. माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना याचे टार्गेट दिले होते. याबाबत खुलासा करण्याचा इशारा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला. त्यावर अजित पवार म्हणाले, कोण काय म्हणतय त्यावर उत्तर द्यायला आम्ही मोकळे नाही. कुणीही कोड्यात बोलू नये. मी उपमुख्यमंत्री असताना अशा प्रकारची कोणतीही चर्चा माझ्या स्तरावर झालेली नाही.

अजित पवार यांनी वरील दोन्ही मुद्द्यांवर भूमिका मांडली असली तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -