घरराजकारणठाकरे-शिंदेंच्या वादाचं आम्हाला देणं-घेणं नाही; छोट्या गोष्टीत रमू नका; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले

ठाकरे-शिंदेंच्या वादाचं आम्हाला देणं-घेणं नाही; छोट्या गोष्टीत रमू नका; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले

Subscribe

मुख्यमंत्र्यांनी राज्याचे हित बघावे, ठाकरेंच्या आणि तुमच्या वादात राज्यातील जनतेला आणि मला काही देणं-घेणं नाही, एकनाथ शिंदेंनी छोट्या गोष्टीत रमू नका, म्हणत आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभेत चांगलेचं सुनावल आहे. एकनाथ शिंदे हे नेहमीप्रमाणे जुन्या गोष्टीमध्ये रमले असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.

राज्याच्या कुठल्याही विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्याला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उत्तर देतात ही आजपर्यंतची परंपरा आहे. सहा महिन्यांपूर्वी काय झालं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्या गोष्टीला आज सहा महिने झाले. मीही सभागृहात ३२ वर्ष झाली आलोय. त्याआधीही मला आवड असल्यामुळे मी इतरांची भाषणं ऐकायचो. शरद पवारांनीही ७८ साली पुलोद स्थापन केलं होतं. तेव्हा अनेक मान्यवर त्या मंत्रीमंडळात होते. पण कधीही मुख्यमंत्र्यांची भाषणं ही राजकीय होत नाहीत. एखाद-दुसरा चिमटा काढला, दोन तीन चिमटे काढले मी समजू शकतो, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

सभागृहात आम्ही विरोधी पक्ष म्हणून जे मुद्दे उपस्थित केले, आता तुम्ही ज्यांना सोडून आलात, त्यांच्या वृत्तपत्रात काही बातम्या येणार. ते तुम्ही मनाला लावून घेणार. ते तुम्ही इथे सांगणार. आम्हाला काय देणं-घेणं आहे त्याचं. यशवंतराव चव्हाणांची शिकवण बघा. आचार्य अत्रे त्यांच्यावर किती टीका करायचे, पुस्तकात वाचलं असेल. तरी ते दिलदारपणे घ्यायचे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही त्यातून बाहेर या. तुम्हाला बहुमत मिळालंय. या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री झाले आहात. असल्या छोट्या गोष्टीत तुम्ही तुमचं मन जास्त रमवू नका. हे राज्यातल्या जनतेला अजिबात आवडणार नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहेत.

राज्यातील जनतेला, तरुणीला, तरुणांना वाटतंय मला काम कसं मिळणार आहे. महागाई कशी कमी होणार आहे., बेरोजगारी कशी कमी होणार आहे? यावर काय धोरण ठरणार आहे. शेतकऱ्यांसंदर्भात इथून पुढच्या काळात काय भूमिका घेतली जाणार आहे? तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करत आहात. जाऊ द्या ना, मुलं आहेत म्हणून सोडून द्या ना. तुमची दुसरी जनरेशन, दुसऱ्या कार्यकर्त्यांना प्रवक्ते म्हणून बोलू द्या ना. त्या खुर्चीवर बसणाऱ्याने राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवावं. तुमचे नरेंद्र मोदींशी, अमित शाहा यांच्याशी चांगले संबंध झालेत. तिथून राज्याच्या भल्यासाठी अजून काय चांगलं आणता येईल हे बघा. राज्याच्या हितासाठी दिल्लीत जा. पण तुम्ही त्यावर बोलत नाही, असही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

आता मुख्यमंत्री अंधश्रद्धेवर पण बोलत आहेत, चांगली गोष्ट आहे. श्रद्धा, अंधश्रद्धेत गफलत होत आहे. सिन्नरला जात असताना तुम्ही कुठे गेलात, जर गेलाच नसता तर कोणी काढलंच नसतं. कारण आपण महाराष्ट्रात राहतो जिथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. जे चांगल आहे त्याच अभिनंदनचं करू. आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक असं म्हणतो, काही जण धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीचं धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तरीही काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर धर्मवीर म्हणतात, असही अजित पवार म्हणाले.

राष्ट्रपुरुषांबाबत चुकीचं वागणाऱ्यां, बोलणाऱ्यांना निषेधपण करत नाही. तुमच्या जवळ बसणाऱ्यांनी चुका केल्या आहेत. ज्यांनी राष्ट्रपुरुषांचा अपमान केला आहे, बेताल वक्तव्य केली आहेत, अपमानास्पद बोलले आहेत त्या सगळ्यांचा निषेध केला पाहिजे. आमच्या बाजूने कोणी बोलले त्यांचा निषेध करण्यासाठी मी कमी पडणार नाही, शिवसेना, काँग्रेसमधील कोण असेल तर त्यांच्या पक्षप्रमुखांनी सांगालं, राष्ट्रवादीचा असेल तर मी सांगेन, मित्रपक्षाचा असेल तरी माझी सांगण्याची तयारी आहे. मी लेचापेचा माणूस नाही, असही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.


अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा, बक्षीस मिळवा; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -