शिंदे भाजपाची लोकप्रियता लवकरच संपवतील, मिटकरींची बोचरी टीका

Shinde Fadnavis two wheeler government Allegation of NCP s Mahesh Tapase

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी केलेल्या ‘उठावा’मुळे शिवसेनेला फटका बसला आहे. पण त्याचबरोबर शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने भाजपाची उरलीसुरली लोकप्रियता देखील ते संपवतील, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ‘उठाव’ करून एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी भाजपाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. भाजपाबरोबर आता 40 आमदार असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ 15च आमदार राहिले आहे. त्यावरून मनसेने, आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस आणि चिन्ह देखील गमवण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले असल्याची टीका केली आहे. तर, भाजपा नेते रावसाहबे दानवे यांनी देखील शिवसेनेत उद्धव आणि आदित्य ठाकरे, ही दोनच माणसे शिल्लक राहणार असल्याची बोचरी टिप्पणी केली आहे.

हेही वाचा – ओबीसी समाजावर घोर अन्याय; नगरपालिका निवडणुकांना राष्ट्रवादीचा विरोध

शिंदे गटाच्या ‘उठावा’चा फटका केवळ शिवसेनेला बसलेला नसून भाजपालाही बसला आहे, अशी अप्रयत्यक्ष टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस दुसऱ्या, चंद्रकांत पाटील तिसऱ्या तर इतर भाजपा नेते चौथ्या व पुढच्या नंबरवर फेकले गेले आहेत. भाजपाची जनमानसातील उरलीसुरली लोकप्रियता शिंदे लवकरच संपवतील, असा विश्वास असल्याचे ट्वीट मिटकरी यांनी केले आहे.

हेही वाचा – आम्हीच शिवसेना, विधिमंडळात आम्हाला मान्यता; दिल्लीतही एकनाथ शिंदेचा पक्षावर दावा