घरराजकारणराहुल गांधींवरील कारवाई चुकीची; एवढी घाई करण्याची गरज नव्हती- बच्चू कडू

राहुल गांधींवरील कारवाई चुकीची; एवढी घाई करण्याची गरज नव्हती- बच्चू कडू

Subscribe

इतक्या घाईने कारवाई करण्याची गरज नव्हती. ठिक आहे,कायदा आहे. या कायद्याचा सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थित उपयोग करायला हवा. राहुल गांधींचे सदस्यत्व जेवढी घाई आणि व्यवस्था होती, तेवढी सामान्य माणसाबद्दल तप्तरता सरकारने दाखवली पाहिजे.

काॅंग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनंतर त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली. त्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच, अनेक नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारला टोला लगावला आहे. आपली आमदारकी गेली तर आपल्याला आनंदच होईल, असे म्हणत त्यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे. सोबतच राहुल गांधींवर एवढ्या लवकर कारवाई करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया कडू यांनी दिली आहे.

राहुल गांधींवर झालेल्या कारवाईवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई ही चुकीची वाटते. इतक्या लवकर त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज नव्हती, असे कडू म्हणाले.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींवरील कारवाईवर बच्चू कडू म्हणाले की, इतक्या घाईने कारवाई करण्याची गरज नव्हती. ठिक आहे, कायदा आहे. या कायद्याचा सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थित उपयोग करायला हवा. राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जेवढी घाई आणि व्यवस्था होती, तेवढी सामान्य माणसाबद्दल तप्तरता सरकारने दाखवली पाहिजे.

( हेही वाचा: “तानाशाही नही चलेगी” म्हणत राहुल गांधींच्या समर्थनार्थ कॉंग्रेस रस्त्यावर )

- Advertisement -

पुण्यात लावण्यात आलेल्या बॅनर्सवर कडूंची प्रतिक्रिया 

राहुल गांधी यांच्याप्रमाणे राज्यात बच्चू कडू यांचीही आमदारकी रद्द व्हायला हवी, अशा आशयाचे बॅनर्स पुण्यात लागले आहेत. त्यावरही आता बच्चू कडून यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, मी स्वत:च्या स्वार्थासाठी लढलो नाही. अपंग बांधवांसाठी माझा लढा होता आणि मला दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एक- एक वर्षाची शिक्षा झाली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुर्ण माहिती घेत नाहीत, म्हणून ते मागे आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

( हेही वाचा: मोठी बातमी:सदा सरवणकरांवर आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल; फडणवीसांनी दिली माहिती )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -