घरराजकारणकसब्यातून काॅंग्रेसकडून इच्छूक असलेल्या बाळासाहेब दाभेकरांनी केली बंडखोरी

कसब्यातून काॅंग्रेसकडून इच्छूक असलेल्या बाळासाहेब दाभेकरांनी केली बंडखोरी

Subscribe

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. धंगेकर यांनी सोमवारी (ता. 6 फेब्रुवारी) निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण यामुळे नाराज झालेल्या बाळासाहेब दाभेकरांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे जोरदार तयारी करण्यात येत आहे. भाजपच्या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी सोमवारी आपले अर्ज भरले. तर कसबा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा सोमवारी आपला अर्ज दाखल केला. यावेळी नाना पटोले, अशोक चव्हाण हे उपस्थित होते. पण यामुळे नाराज झालेले बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासाहेब दाभेकरांनी शक्तिप्रदर्शन करत कसबा विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर, नगरसेवक रवींद्र धंगेकर आणि कमल व्यवहारे यांच्या नावाची चर्चा होती. पण काँग्रेसकडून विचार विनिमय करून अखेरीस रवींद्र धंगेकर यांच्या नावाला हिरवा कंदील देण्यात आला. यामुळे काँग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर नाराज झाले.

- Advertisement -

बाळासाहेब दाभेकर हे नाराज असल्याची चर्चा या मतदारसंघात करण्यात येत होती. पण ज्यांना उमेदवारी देण्यात आली नाही, अशा इच्छुकांची नाराजी दूर करण्यात येईल, असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. पण असे करण्यास काँग्रेस नेते असमर्थ ठरल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून ‘या’ उमेदवाराच्या नावावर झाले शिक्कामोर्तब

- Advertisement -

नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरापासून या शक्तिप्रदर्शनाच्या रॅलीला सुरुवात झाली. नंतर ही रॅली पुढे केसरीवाडा गणपती, दगडूशेठ गणपती मंदिर मार्गे गणेश कला क्रीडा रंगमंचाच्या सभागृहाजवळ समाप्त झाली. यानंतर दाभेकरांनी आपला अर्ज दाखल केला. दरम्यान, यामुळे आता काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. तर दाभेकरांच्या बंडखोरीचा भाजपला फायदा होऊ शकतो, असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे दाभेकरांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसमधील आणखी एक वाद चव्हाट्यावर आला आहे. आजच (ता. 7 फेब्रुवारी) सकाळी काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -