घरराजकारणगजानन किर्तीकरांना शिंदे गटा कडून मोठी ऑफर

गजानन किर्तीकरांना शिंदे गटा कडून मोठी ऑफर

Subscribe

किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांना देखील आपल्यात सामील करण्यासाठी शिंदेंनी जोर लावला आहे

शिवसेनेतील आणखी काही आमदार, खासदार आपल्या गटात कशा प्रकारे शामिल करता येतील यासाठी शिंदे गटाकडून दररोज नवीन प्लॅन आखला जातोय सध्या 40 आमदार आणि 12 खासदारांचं संख्याबळ मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. दरम्यान शिंदेंनी आपला मोर्चा शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांकडे देखील वळवला आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांना शिंदे गटात सामील होण्यासाठी मोठी ऑफर देण्यात आली असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. यासह किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांना देखील आपल्यात सामील करण्यासाठी शिंदेंनी जोर लावला मात्र अमोल यांनी शिंदे गटात जाण्यास साफ नकार दिला आहे.

किर्तीकर पिता पुत्रांना शिंदे गटाकडून मोठी ऑफर

- Advertisement -

दरम्यान, शिंदे गटाकडून गजानन किर्तीकर यांना मोठी ऑफर देण्यात आली. किर्तीकरांना थेट केंद्रात मंत्रीपद तर त्यांच्या मुलगा अमोल यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्याची बडी ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याच दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारी अमोल किर्तीकर यांना दिली. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची रणनीती यावेळी ठाकरेंनी आखली. यामुळेच अमोल  यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय बदलला आणि गजानन किर्तीकर यांनी देखील मुलाची री ओढत उद्धव ठाकरेंची साथ कायम ठेवली अशी माहिती समोर येतेय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील संख्याबळ किती

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ते आजतागयत त्यांच्याकडे 40 आमदार आणि 12 खासदर आहेत. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली यानंतर खरी शिवसेना कुणाची?, असा संघर्ष दोन्ही गटात पेटला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडे संख्याबळ जरी जास्त असंल तरी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांचा त्यांना पाठिंबा आहे की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. लीलाधर डाके, गजानन किर्तीकर, मनोहर जोशी या जेष्ठ नेत्यांची काही दिवसांपूर्वी शिंदेंनी सदीच्छ भेट घेतली होती. मात्र यानंतर राजकारणात नवी खेळी रंगण्यास सुरूवात झाली.

गजानन किर्तीकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा

दरम्यान, गजानन किर्तीकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या अनेक वावड्या उठू लागल्या होत्या. मात्र या चर्चा सध्या हवेतच विरल्या आहेत. काही दिवांपूर्वी शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी झालेल्या बैठकीत किर्तीकर देखील सामील होते तसचे उद्धव ठाकरेंनी अमोल किर्तीकर यांची उपनेतेपदी नियुक्ती केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला मात्र आगामी काळात काय घडेल हे पाहणं महत्वाच ठरणारं आहे.

 

हे ही वाचा –

उध्दव ठाकरेंसोबत धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो, पुण्यात रंगली बॅनरबाजी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -