घरराजकारणभाजपने टाकले सत्ता स्थापनेच्या दिशेने पहिले पाऊल, बहुमत ठरावावेळी होणार फायदा

भाजपने टाकले सत्ता स्थापनेच्या दिशेने पहिले पाऊल, बहुमत ठरावावेळी होणार फायदा

Subscribe

शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचे बोलले जात होते. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून भाजपने अत्यंत सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले. भाजपच्या कोणत्याचे नेत्याने या बंडाबाबत वक्तव्य केले नाही. पण आता भाजपने आता आपली खेळी करण्यास सुरूवात केली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena leader Eknath Shinde) यांच्या बंडानंतर (revolt) राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे निश्चित आहे. त्यामुळे २०१९ मध्ये सरकार स्थापन करण्याची संधी शिवसेनेने हिसकावून घेतल्यानंतर आता भाजपला आयतीच संधी चालून आली आहे. शिंदे यांना शिवसेनेतील ४२ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजप (bjp) या बंडखोर आमदारांच्या साथीने सरकार स्थापन करू शकते. तशी तयारीही आता भाजपने सुरू केली आहे.

शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचे बोलले जात होते. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून भाजपने अत्यंत सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले. भाजपच्या कोणत्याचे नेत्याने या बंडाबाबत वक्तव्य केले नाही. पण आता भाजपने आता आपली खेळी करण्यास सुरूवात केली आहे. आपल्याला पाठिंबा दिलेल्या अपक्षांची विधिमंडळात सहयोगी म्हणून नोंदणी करून घेण्याची प्रक्रिया भाजपने सुरु केली आहे. याचा फायदा भाजपला बहुमत ठरावाच्यावेळी होऊ शकतो. त्यामुळे भाजपने राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

- Advertisement -

दरम्यान, बंडखोर आमदारांना मार्गदर्शन करतानाचा एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओतून एकनाथ शिंदे यांच्या या बंडखोरीच्या मागे भाजपच असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्याला राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असून ते काहीच कमी पडू देणार नाही, असे शिदें या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत. आपली सर्व सुख-दुःख सारखीच असून काही असेल तर आपण एकजुटीने करायचं आहे, असेही  शिंदे आमदारांना सांगत आहेत. शिंदे ज्या राष्ट्रीय पक्षाबद्दल आमदारांना सांगत आहेत तो भाजपच असल्याचा दावा करण्यात येत आहे. यादरम्यान, भाजपच्या गोटातही हालचालींना वेग आला असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -