घरराजकारणसत्ता गेल्यावर शिवसैनिक आठवले, भाजपाची टीका

सत्ता गेल्यावर शिवसैनिक आठवले, भाजपाची टीका

Subscribe

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाविकास आघाडी सरकारला उद्या विधिमंडळात बहुमत सिद्ध करावे लागणार होते. पण त्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रात्री उशिरा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सत्ता गेल्यावर शिवसैनिक आठवले, अशी टीका भाजपाने केली आहे.

शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेडा फडकावला आणि त्यानंतर शिवसेना तसेच आघाडीतील इतर आमदार त्यांच्या गोटात सहभागी झाले. त्यामुळे हे ठाकरे सरकार अल्पमतात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. आम्ही हपालेले होऊन जात नाही, असे ते म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय म्हणजे? बहुमत गमावल्यावर करावाच लागतो…, अशी बोचरी टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तसेच, सत्ता गेल्यावर शिवसैनिक आठवले, महाराष्ट्राचे डोळे पाणावले, अडीच वर्षे सुडाचे राजकारण करणारे, सुसंस्कृतपणाची भाषा बोलू लागले, कोर्टाच्या दणक्यानंतर, राजीनामा देऊ लागले, असेही ट्विट त्यांनी केले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -