घरराजकारणभाजपच्या मोहित कंबोज यांचे वादग्रस्त ट्वीट; लिहिले, सुषमा अंधारे आणि राखी सावंत...

भाजपच्या मोहित कंबोज यांचे वादग्रस्त ट्वीट; लिहिले, सुषमा अंधारे आणि राखी सावंत…

Subscribe

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल वादग्रस्त ट्वीट केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भाजप आणि ठाकरे गट यांच्यामधील शाब्दिक वाद आता टोकाला गेलेला आहे. या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सोशल मिडीयामध्ये एकमेकांवर खालच्या पातळीची टीका आणि शब्दांचा प्रयोग करत असतात. पण आता तर या पक्षातील नेत्यांचीच एकमेकांवर टीका करताना पातळी घसरल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख नेते असो किंवा भाजपचे प्रमुख नेते यांची टीका करण्याची पद्धत राजकारणाला अशोभनीय आहे, असेच म्हणावे लागेल. आता भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्याबद्दल वादग्रस्त ट्वीट केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मोहित कंबोज यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “सुषमा अंधारे और राखी सावंत दोनों बहन हैं … एक बहन महाराष्ट्र की राजनीति में और दूसरी बहन महाराष्ट्र सिनेमा में ….. दोनों एक दूसरे की प्रतियोगी भी हैं की रोज़ ज़्यादा… सनसनी कौन मचाई गा !” त्यांच्या अशा आशयाच्या ट्वीटमुळे आता आणखी एका नव्या वादाला सुरूवात झाली आहे. ज्याप्रमाणे नेहमी राखी सावंत ही कोणत्या ना कोणत्या कारणावरून रोज सनसनी निर्माण करत असते, त्याचप्रमाणे सुषमा अंधारे या देखील तिची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या दोघींमध्ये दररोज खळबळजनक वक्तव्य कोण करेल यासाठी स्पर्धा सुरू असते, असे मोहित कंबोज यांच्याकडून त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिण्यात आले आहे. पण मोहित कंबोज यांच्या ट्वीटला सुषमा अंधारे नेमके काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

सुषमा अंधारे यांच्याबाबत आधी सुद्धा भाजप नेत्यांकडून आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेले आहे. पण आता मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांची तुलना कायम चर्चेत राहणारी वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंत हिच्यासोबत केल्याने आणखी एक वाद निर्माण झाला आहे.

ठाकरे गट आणि भाजपमध्ये फडतूस आणि काडतूस या शब्दावरून कलगीतुरा रंगला आहे. या मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. ज्यामुळे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त ट्वीट केले असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत काँग्रेसचा मशाल मोर्चा, महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते राहणार उपस्थित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -