घरराजकारणचलो शिवाजी पार्क..., सूचक ट्वीट करत निलेश राणेंचा शिवसेनेच्या ठाकरे गटाला टोला

चलो शिवाजी पार्क…, सूचक ट्वीट करत निलेश राणेंचा शिवसेनेच्या ठाकरे गटाला टोला

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रात सध्या शिवसेनेच्या दोन गटांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला भाजपाचे पाठबळ आहे. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन आहे. या पार्श्वभूमीवर हे मेळावे होत असल्याने भाजपाचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी सूचक ट्वीट करत शिवसेनेच्या ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार असून एकनाथ शिंदे यांचा वांद्रे कुर्ला संकुलात (बीकेसी) होणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबरोबरच 3 नोव्हेंबरला होणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमुळे या दोन्ही मेळाव्यांना विशेष महत्त्व आले आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. तसेच शिवाजी पार्क येथे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही मैदानात उतरली आहे. मातोश्रीबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करत, ‘परंपरा अखंड राहू द्या’ असे म्हटले होते.

तर, संघर्ष हे होतच असतात. परंतु त्याला काहीतरी एक मर्यादा ठेवली पाहिजे. राज्यातील जबाबदार लोकांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावले टाकली पाहिजेत. पावले टाकण्याची जबाबदारी राज्याच्या प्रमुखांवर अधिक आहे. त्यामुळे कटुता वाढेल असं काही करू नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना दिला आहे.

- Advertisement -

पण या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाच्या निलेश राणे यांनी ट्वीट करीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. या ट्वीटद्वारे पोस्ट केलेल्या फोटोमध्ये गाडीत बसलेली एक व्यक्ती मोबाइलवर बोलत आहे. त्या व्यक्तीच्या हातातील मोबाइलवर शिवसेनेचा स्टिकर आहे. तर, त्याच्या डोक्यावर राष्ट्रवादीचे चिन्ह आणि झेंडा असलेले मुंडासे आहे. या फोटोला ‘चलो शिवाजी पार्क…’ अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे.

हेही वाचा – नाना पटोलेंसह तुमच्या लोकांना सल्ले द्या; फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -