घरराजकारणशिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या! 15 ते 18 मंत्री घेणार शपथ?

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या! 15 ते 18 मंत्री घेणार शपथ?

Subscribe

मुंबई : बहुप्रतीक्षित शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त आता सापडला असून उद्या हा विस्तार होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील या विस्तारात 15 ते 18 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यात आता कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, हेच उत्तर प्रत्येकवेळी देत होते. तर दुसरीकडे, नवे सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेल्यानंतरही मंत्रिमंडळात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशिवाय इतर कोणत्याही मंत्र्याचा शपथविधी न झाल्याने विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्तार करायाला कशाला घाबरता, असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ‘दोघांचे जम्बो मंत्रिमंडळ’ असे म्हणून तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘दोन लोकांचे अपंग मंत्रिमंडळ’ असे म्हणून हिणवले आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपला नियोजित मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली दौरा रद्द केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांची ‘नंदनवन’मध्ये भेट घेतली. त्यावर नव्या मंत्र्यांच्या नावांची यादीवर शिक्कामोर्तेब होईल आणि नंतर ती यादी राज्यपालांकडे सोपविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेश 10 ते 18 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

फॉर्म्युला ठरला?
मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या फॉर्म्युल्यानुसार शिंदे गटाला 35 टक्के तर, भाजपाला 65 टक्के मंत्रीपदे मिळतील. जम्बो मंत्रिमंडळ पद्धतीला आळा घालण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाचा विस्तार 42 मंत्रिपदांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. ते ध्यानी घेता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगळता उर्वरित 40 पदांपैकी शिंदे गटाला 15 तर, भाजपाच्या वाट्याला 25 मंत्रीपदे येतील. यात राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली. त्यामुळे आता मंत्रीपदाची लॉटरी कोणाकोणाला लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -