घरराजकारणगृहमंत्रालय झेपत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळेंचं विधान

गृहमंत्रालय झेपत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळेंचं विधान

Subscribe

राज्यात झालेली दंगल ही गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्यात कायदा, सुव्यवस्था राखणं जर जमत नसेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी छत्रपती संभाजीनगर परिसरात झालेला राड्याप्रकरणी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले आहे. राज्यात झालेली दंगल ही गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्यात कायदा, सुव्यवस्था राखणं जर जमत नसेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. कोयता गँगचा धुमाकूळ, राज्यात होणाऱ्या दंगली, संजय राऊत यांना दिली जाणारी धमकी, हे राज्यातील गृहमंत्र्यांचे अपयश आहे. गृहमंत्रालय जर झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊन गृहमंत्रालय सोडून द्यावे, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

हे सरकार वाचाळवीरांचे 

संजय राऊत धमकीप्रकरणी शिवसेनेचे नेते सांदिपान भुमरे यांनी हा स्टंट असल्याचा  म्हटले आहे. त्यावरुन सुप्रिया सुळे यांना प्रश्न केला असता त्या म्हणाल्या की, हे सरकार हे वाचाळविरांचे सरकार आहे. त्यामुळे या सरकारमधील मंत्री आणि आमदार काहीही बोलले तरी मला आश्चर्य वाटत नाही, असे सांगतानाच सुप्रिया सुळे यांनी तुम्ही पत्रकारांनीच त्यांना वाचाळवीर ही पदवी दिली आहे, असे म्हणत खोचक टोला लगावला आहे.

- Advertisement -

राऊतांना झेड प्लस सुरक्षा द्यावी

संजय राऊतांना मिळालेली धमकी ही गंभीर बाब आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तत्काळ राऊत यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, असेही त्या म्हणाल्या. संजय राऊत हे खासदार आहेत आणि या देशाचे वरिष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यात यावी.

असं राजकारण हे दुर्दैवी 

पुण्यातील भावी खासदार म्हणून जगदीश मुळीक यांच्या नावाचे बॅनर लागल्याने सुप्रिया सुळे यांनी या मुद्दयावरुन सरकारला लक्ष्य केले आहे. अशाप्रकारचे राजकारण जर कोणत्याही पक्षाकडून केले जात असले तर ते दुर्दैवी आहे. गिरीश बापट यांना जाऊन काही दिवसच झाले आहेत, कोणीही त्या दुख:तून सावरलेलं नसताना, ही अशी बॅनरबाजी योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या.

- Advertisement -

धमकी हा राऊतांचा स्टंट 

संजय राऊत हे चर्चेत राहण्यासाठी नेहमीच काही ना काही करत असतात. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी त्यांनी बिश्नोईकडून आपल्याला धमकी आल्याचा बनाव रचला असेल, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -