घरराजकारणनांदेड दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली माहिती, म्हणाले...

नांदेड दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली माहिती, म्हणाले…

Subscribe

तत्काळ बोलावण्यात आलेल्या या बैठकीमुळे नांदेड आणि हिंगोलीचा दौरा रद्द झाला असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, बैठक संपताच एकनाथ शिंदे आपल्या पूर्वनियोजित दौऱ्याला रवाना झाला. तेथे ते कार्यकर्त्यांशी भेटून सभा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) बैठकीमुळे नांदेड आणि हिंगोली येथील मुख्यमंत्र्यांचा (CM Eknath Shinde) नियोजित दौरा रद्द होण्याची शक्यता होती. मात्र, नंदनवन येथील त्यांची बैठक संपताच ते आता नांदेड (Nanded Visit) येथे दाखल झाले आहेत. नांदेड येथील विमानतळावर दाखल होताच त्यांना पत्रकारांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारलं. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच बातमी मिळेल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. दरम्यान, कोणाला कोणतं खातं द्यायचं याबाबत उद्यापर्यंत नावं निश्चित होतील, असंही ते म्हणाले. (Cm Eknath Shinde talked about cabinet expansion)

हेही वाचा – १० ते १८ ऑगस्ट दरम्यान विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन!

- Advertisement -

मंत्रिमंडळ विस्तार उद्या सकाळी ११ वाजता होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे आज उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच, तत्काळ बोलावण्यात आलेल्या या बैठकीमुळे नांदेड आणि हिंगोलीचा दौरा रद्द झाला असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, बैठक संपताच एकनाथ शिंदे आपल्या पूर्वनियोजित दौऱ्याला रवाना झाला. तेथे ते कार्यकर्त्यांशी भेटून सभा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा – शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या! 15 ते 18 मंत्री घेणार शपथ?

- Advertisement -

दरम्यान, उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. तर, १० ते १८ ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशन होणार आहे. पावसाळी अधिवेशनासाठी तुर्तास लहान विस्तार करण्यात येणार आहे. भाजपकडून ८ सदस्य तर, शिवसेनेचे ७ सदस्य उद्या शपथ घेऊ शकतील. तसेच, अपक्ष समर्थक आमदारांचा अधिवेशननंतर विस्तारात समावेश होईल असं सांगण्यात येतंय. दुसरीकडे विधिमंडळात सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याचं म्हटलं जात आहे. तर, ९ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – भाजपचा एकेक मित्र गळावया… टीडीपी, शिरोमणी, शिवसेना आणि आता जदयू?

अधिवेशन गाजणार?

गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात अवघ्या दोन जणांचे सरकार राज्य चालवत आहेत. गेल्या दीड महिन्यात सातशेहून अधिक जीआर मान्य करण्यात आले आहेत. तर, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णय रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री सतत दिल्ली दौऱ्यावर जातात आणि उपमुख्यमंत्री राज्य कारभार हाकत असल्याची टीका केली जातेय. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून काय रणनीती आखण्यात येतेय हे पाहावं लागेल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -