घरराजकारणसुरत कोर्टाच्या निकालानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया म्हणाले, मेरा धर्म सत्य और अहिंसा...

सुरत कोर्टाच्या निकालानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया म्हणाले, मेरा धर्म सत्य और अहिंसा…

Subscribe

न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर आता काॅग्रेस पक्षाचे नेते आणि माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, "मेरा धर्म सत्य और अहिंसा पर आधारित है, सत्य मेरा भगवान है, अहिंसा उसे पाने का साधन", या महात्मा गांधींच्या ओळी त्यांनी ट्वीट केल्या आहेत.

चोरों का सरनेम मोदी क्यों होता है? राहुल गांधी यांनी असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने मोठा निर्णय देत राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर आता काॅंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, “मेरा धर्म सत्य और अहिंसा पर आधारित है, सत्य मेरा भगवान है, अहिंसा उसे पाने का साधन”, या महात्मा गांधींच्या ओळी त्यांनी ट्वीट केल्या आहेत.

राहूल गांधींचे ट्वीट काय?

मोदी या आडनावाविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यावर प्रतिक्रिया म्हणून राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले आहे. “मेरा धर्म सत्य और अहिंसा पर आधारित है, सत्य मेरा भगवान है, अहिंसा उसे पाने का साधन”, या महात्मा गांधींच्या ओळी त्यांनी ट्वीट केल्या आहेत. त्यावर अनेक लोकांनी रिट्वीटदेखील केले आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: सभेनंतर राज ठाकरेंविरोधात पुण्यात तक्रार दाखल; काय आहे प्रकरण? )

- Advertisement -

 

राहुल गांधींना कोर्टाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील हे प्रकरण आहे. राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी सुरतच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी यावर निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर काही वेळातच राहुल गांधी यांचा जामीनही मंजूर करण्यात आला. सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: न्यायालयात हजर होते. यावेळी गुजरातमधील काॅंग्रसेच्या अनेक बडे नेत्यांनीही उपस्थिती लावली होती.

( हेही वाचा: ‘बिरबलाची खिचडी’ ची चूल मांडत विरोधकांनी केला सरकारचा निषेध )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -