घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३Karnataka Election Result 2013 : कर्नाटक विजयानंतर डी.के. शिवकुमार भावनिक, ओघळले अश्रू

Karnataka Election Result 2013 : कर्नाटक विजयानंतर डी.के. शिवकुमार भावनिक, ओघळले अश्रू

Subscribe

कर्नाटकाच्या राजकारणात डीके शिवकुमार यांना कनकपुरचा पहाडी नेता म्हणून ओळखले जाते. डीके शिवकुमार हे काँग्रेसच्या हायकमांडच्या जवळचे नेत्यांपैकी एक मानले जाते.

मुंबई | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Result 2023) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी कनकपुरा विधानसभा मतदारसंघातून दमदार विजय मिळला आहे. डीके शिवकुमार यांनी कर्नाटकचे मंत्री आर अशोक यांचा पराभव केला आहे. विजय मिळाल्यानंतर डीके शिवकुमार यांनी मंदिरात डोके टेकवून देवाचे आभार मानले. यानंतर डीके शिवकुमार यांनी घराच्या बाल्कनीत येऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिवादन केले आहेत. यावेळी डीके शिवकुमार यांनी माध्यमांशी बोलताना डोळ्यातून अश्रू ओघळले.

डीके शिवकुमार म्हणाले, “मी माझ्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना यशाचे श्रेय देतो. आम्ही लोकांचा पर्दाफाश केला. मी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना विजयाची हमी दिली होती. “जेव्हा मी तुरुंगात होतो, तेव्हा सोनिया गांधी मला तुरुंगात भेटायला आल्या होत्या. मी ते कधीच विसरू शकत नाही. त्यावेळी मी पदावर राहण्याऐवजी तुरुंगात राहणे पसंत केले,” असे डीके शिवकुमार यांनी तुरुंगातील आठवणींना उजाळा देत डोळ्यातून अश्रू आले.

- Advertisement -

कर्नाटकाच्या राजकारणात डीके शिवकुमार यांना कनकपुरचा पहाडी नेता म्हणून ओळखले जाते. डीके शिवकुमार हे काँग्रेसच्या हायकमांडच्या जवळचे नेत्यांपैकी एक मानले जाते. डीके शिवकुमार यांना मनी लँड्रिंगच्या आरोपावरून सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना तुरुंगात गेले होते.

कनकपुरा मतदारसंघातून नऊ वेळा आमदार

- Advertisement -

यावेळीही ते त्यांचा मतदारसंघ कनकपुरा येथून निवडणूक लढवत होते. त्यांचा मतदारसंघ याचसाठी कारण ते येथून आठ वेळा आमदार झाले आहेत. कनकपुरा येथे ते भाजप सरकारमध्ये महसूल मंत्री असलेले आर अशोक यांच्या विरोधात होते. तब्बल 22 वर्षांनंतर कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार आहे. कर्नाटकात काँग्रेसने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा – Karnataka Election Results 2023: कर्नाटकातील काँग्रेसचे ‘संकटमोचक’; जाणून घ्या कोण आहेत डीके शिवकुमार?

काँग्रेससाठी संकटमोचक

डीके शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसमधील सर्वात श्रीमंत नेते आहेत. त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्याकडे 840 कोटींहून अधिक संपत्ती आहे. जेव्हा-जेव्हा काँग्रेस पक्षाला निधीची गरज भासते, तेव्हा शिवकुमार तिथे उभे राहतात, म्हणजेच ते पक्षासाठी एक प्रकारे संकटमोचकची भूमिका बजावत आहेत. मात्र, ते सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभागाच्या चौकशीतही सापडले आहेत. निवडणुकीपूर्वी 104 दिवस ते तुरुंगात होते. आता ते जामिनावर बाहेर आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -