नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची घोषणा केली आहे. मल्लिकार्जून खर्गे यांनी या समितीमध्ये काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेत्या आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खर्गे यांच्या निवडणूक लढवणाऱ्या शशी थरुर यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. तर, महाराष्ट्रातून मुकूल वासनिक आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, यांच्याशिवाय महाराष्ट्रातील आणखी नेत्यांना निमंत्रित म्हणून संधी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनीही यासंदर्भात ट्वीट करून पक्ष नेतृत्त्वाचे आभार मानले आहेत.
(Congress president Mallikarjun Kharge has constituted the congress working committee Ashok Chavan given big responsibility )
अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र, आपण कुठेही जाणार नाही, मी काँग्रेसमध्येच आहे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर, अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे, या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. आता, काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांना मोठी जबाबदारी देण्यात आली होती. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातून एकमेव अशोक चव्हाण यांना स्थान देण्यात आलं आहे. हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून मी या सेवेसाठी आभारी असल्याचं अशोक चव्हाण यांनी निवडीनंतर ट्वीटरवरून प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
काँग्रेस पक्षाचे मुल्ये आणि तत्त्वे जपण्यासाठी, पक्षाच्या वाढीसाठी आणि यशात योगदान देण्यासाठी मी संपूर्ण ताकदीने समर्पित आहे. पुढे असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याकडे मार्गक्रमण करण्यासाठी सर्वच सहकारी आणि काँग्रेस नेतृत्वासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे, असेही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस पक्षात सर्वोच्च असलेल्या काँग्रेस कार्यसमितीवर काम करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून, त्यासाठी मी काँग्रेस अध्यक्ष मा.खा. मल्लिकार्जूनजी खरगे, माजी काँग्रेस अध्यक्षा मा.खा. सोनियाजी गांधी, देशाचे आशास्थान मा.खा. राहुलजी गांधी आणि पक्षाचे महासचिव मा.खा.… pic.twitter.com/Mta4Qj8fIt
— Ashok Chavan (@AshokChavanINC) August 20, 2023
(हेही वाचा: ‘तुम्हाला पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’; ठाकरे गटाची गडकरींना मोठी ऑफर )
- काँग्रेस वर्किंग कमिटी
१. मल्लिकार्जुन खर्गे
२. सोनिया गांधी
३. मनमोहन सिंह
४. राहुल गांधी,
५. अधीर रंजन चौधरी
६. ए. के. अँटोनी
७. अंबिका सोनी
८. मीरा कुमार
९. दिग्विजय सिंह
१०. पी. चिदंबरम
११. तारिक अन्वर
१२. लाल थानावाला
१३. मुकुल वासनिक
१४. आनंद शर्मा
१५. अशोक चव्हाण
१६. अजय माकन
१७. चरणजीतसिंग चन्नी
१८. प्रियंका गांधी
१९. कुमारी शैलजा
२०. गायखंगम
२१. एन. रघुवीर रेड्डी
२२. शशि थरुर
२३. ताम्रध्वज साहू
२४. अभिषेक मनु संघवी
२५. सलमान खुर्शिद
२६. जयराम रमेश
२७. जितेंद्र सिंह
२८. रणदीप सिंह सूरजेवाला
२९. सचिन पायलट
३०. दिपक बाबरिया
३१. जगदीश ठाकोर
३२. जी. ए. मिर
३३. अवनिश पांडे
३४. दीपा दास मुन्शी
३५. महेंद्रजितसिंह मालविय
३६. गौरव गोगोई
३७. सय्यद नासिर हुसैन
३८. कमलेश्वर पटेल
३९. के. सी. वेणूगोपाल - स्थायी आमंत्रितांच्या यादीत महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांच्यासह 18 सदस्यांना स्थान देण्यात आले आहे.
- स्थायी आमंत्रित 18
१. विरप्पा मोईली
२. हरिश रावत
३. पवनकुमार बंसल
४. मोहन प्रकाश
५. रमेश चेन्नीथला
६. बी. के. हरिप्रसाद
७. प्रतिभा सिंह
८. मनिष तिवारी
९. तारिक हमिद केरा
१०. दिपेंद्र सिंह हुड्डा
११. गिरीश राय चोदनकर
१२. टी. सुब्बारमी रेड्डी
१३. के. राजू
१४. चंद्रकांत हंडोरे
१५. मिनाक्षी नटराजन
१६. फुलो देवी नेतम
१७. दामोदर राजा नरसिम्हा
१८. सुदीप रॉय बर्मन