घरराजकारणखऱ्या शिवसेनेचा वाद, मनसेने ट्वीट केला 'हा' व्हिडीओ

खऱ्या शिवसेनेचा वाद, मनसेने ट्वीट केला ‘हा’ व्हिडीओ

Subscribe

मुंबई : भाजपाच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपली शिवसेनाही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारावर चालणारी शिवसेना असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे ही शिवसेना खरी की, शिवसेना पक्षाध्यक्ष ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खरी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आज आणि उद्या असे दोन दिवस विधिमंडळात एकनाथ शिंदे सरकाचे शक्तिप्रदर्शन होणार आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असून उद्या नव्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. अध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे यांनी व्हिप जारी केलेला असतानाच शिंदे यांनीही व्हिप जारी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयाला कुलूप, कारण काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर जोरदार टीका केली आहे. खरी शिवसेना कोणाची? चाळीसच्या आसपास आमदार असण्याऱ्या एकनाथ शिंदेंची की बाळासाहेबांच्या आग्रहाखातर राजसाहेबांनी प्रस्ताव मांडून कार्यध्यक्ष बनवलेल्या उद्धव ठाकरे यांची. हा प्रश्न कदाचित कोर्टात सोडवला जाईल, पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे ‘शिवसैनिक’ या पदाची व्याख्या काय? जो बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन काम करतोय की, ज्याने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलंय तो? याचा निर्णय अर्थात शिवसैनिकांनीच घ्यायचाय, असे ट्वीट कालच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले होते.

- Advertisement -

तर, आज ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटातील एका दृश्याची क्लीप ट्वीट करून संदीप देशपांडे यांनी या वादाची खिल्ली उडवली आहे. आपणच खरे ‘तेजा’ असल्याचा दावा दुहेरी भूमिकेतील परेश रावल करत असल्याचे हे दृश्य आहे. ‘आठवलं म्हणून पाठवलं, याचा सध्याच्या शिवसेनेच्या राजकारणाशी संबंध नाही याची कृपया नोंद घ्यावी,’ अशी टिप्पणी देखील संदीप देशपांडे यांनी केली आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -