घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३Karnataka Politics : सरकार स्थापनेची तारीख ठरली, तरी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरूच..

Karnataka Politics : सरकार स्थापनेची तारीख ठरली, तरी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरूच..

Subscribe

20 मेला बंगळुरूत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हायकमांड यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसमधील एक मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपला पराभूत करत दणदणीत विजय मिळवला आहे. येत्या 20 मेला बंगळुरूत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण इतकं सगळ ठरलं असलं तरी राज्यातील काँग्रेसमधील नाराजी नाट्य मात्र संपलेले नाही. सुरूवातीला डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. पण त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आल्यानंतर हायकमांड यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसमधील आणखी एक मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – Karnataka CM सिद्धरामय्या, DCM डी.के. शिवकुमार; KC वेणुगोपाल यांची घोषणा

- Advertisement -

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि नेते जी परमेश्वर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिद्धरमय्या यांना मुख्यमंत्री आणि डी.के.शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री केल्याने दलित समाज दुखावला गेला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “कर्नाटकमध्ये दलित व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी होती. पण असं झालं नाही. दलित समाज दुखावला गेला आहे. मलाही सरकार चालवता आलं असतं. मुख्यमंत्री नाही तर किमान मला उपमुख्यमंत्री बनवायला हवं होतं.” त्यामुळे सगळं काही ठरून सुद्धा काँग्रेसमधील नाराजी नाट्य आणि सुरू असलेली धुसफूस कधी शांत होणार असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाल्यानंतर काँग्रेस हायकमांडसमोर मुख्यमंत्री पदी कोणाची निवड करायची? याबाबतचे मोठे आव्हान उभे राहिले होते. डी. के. शिवकुमार यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले नसले तरी मुख्यमंत्री पद त्यांनाच मिळावे, असे त्यांचे मत होते. पण यासाठी काँग्रेसच्या हायकमांडने तीन ज्येष्ठ नेत्यांची निरीक्षक म्हणून निवड केली. या तीन नेत्यांनी नवनिर्वाचित आमदारांशी चर्चा करून मुख्यमंत्री कोणाला करण्यात यावे, याबाबत चर्चा केली. पण यावेळी आमदारांनी सिद्धरमय्या यांच्या नावाला पसंती दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबतचा अहवाल तीन निरीक्षकांनी काँग्रेसच्या हायकमांडसमोर सादर केला. कर्नाटक ते दिल्ली अशी 100 तास चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर पक्षातील अंतर्गत वाद बाहेर येऊ नये यासाठी सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर कर्नाटकातील राजकीय संकट सुटल्याचे म्हटलं जातंय.

- Advertisement -

पण काँग्रेसमध्ये 50-50 चा फार्मुला वापरण्यात येणार असल्याने डी. के. शिवकुमार हे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असले तरी त्यांना देखील नंतर मुख्यमंत्री पद मिळणार आहे. पण आता माजी उपमुख्यमंत्री राहिलेल्या जी परमेश्वर यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेसमध्ये आणखी कोण कोण नाराज आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -