घरराजकारणनितीश कुमार पुनर्विचार करू शकतात, केसरकरांची बिहारमधील घडामोडींवर प्रतिक्रिया

नितीश कुमार पुनर्विचार करू शकतात, केसरकरांची बिहारमधील घडामोडींवर प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने भाजपाशी काडीमोड घेऊन राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसला सोबत घेत नव्याने सरकार स्थापन केले. त्यावरून भाजपाला लक्ष्य केले जात आहे. त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि नवनियुक्ती मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितीश कुमार पुनर्विचार करू शकतात, असे ते म्हणाले.

- Advertisement -

आपला पक्ष फोडण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचा आरोप जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार यांनी केला आणि मंगळवारी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेडचे गठबंधन सरकार सत्तेत आले. नितीश कुमार यांनी बुधवारी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

हेही वाचा – राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो, शिवसेनेचे भाजपावर शरसंधान

- Advertisement -

भाजपा हा मित्रपक्षांना हळूहळू संपवतो. नितीश कुमार यांचीही हीच तक्रार होती. महाराष्ट्रातही हेच पाहायला मिळाले. इतकी वर्ष एकत्र राहिलेलल्या शिवसेनेची अवस्था तशीच केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तर, भाजपा कधीही मित्रपक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रात त्यावेळी शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळे खरी शिवसेना आमच्यासोबत आली. असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

तर, आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर सत्तेत बसलेल्या व आता भाजपाशी युती केलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने सावध भूमिका घेतली आहे, मला त्यांच्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करायची नाही. ते ज्येष्ठ राजकारणी आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याची चांगली सेवा केली आहे. पण आपण चुकीचा पक्ष निवडला आहे असे वाटल्यास, ते आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करू शकतात, असे शिंदे गटाचे प्रवक्ते व नवनियुक्त मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

हेही वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला; तीन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -